स्थायी समितीला अंधारात ठेऊन सुरेश केंद्रेंनी खर्च केले साडेसात कोटी, सात मिनिटात झाले निलंबन

Foto

औरंगाबाद- महानगर पालिकेतील स्थायी समितीला कोणतीही कल्पना न देता साडेसात कोटी रुपये खर्च करुन मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांनी नियमांचे उल्‍लंघन केले. यामुळे त्यांना निलंबित करावे असे आदेश स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनी प्रशासनास दिले.

 

मनपाचे मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे हे लोकप्रतिनिधींचे फोन घेत नाहीत. सांगितलेली कामे करीत नाहीत, असा मुद्दा आज स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केला. यावेळी सभापती वैद्य यांनी लेखाधिकार्‍यांना जाब विचारला तसेच स्थायी समितीला कोणतीही पूर्व कल्पना न देता साडेसात कोटींचा खर्च कसा काय केला, असा प्रश्‍न विचारला. केंद्रे यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने सभापती वैद्य यांनी केंद्रे यांना निलंबित करण्याची कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास दिले.गेल्या आठवड्यात सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द करण्यात आलेल्या व रिलायन्स मॉल,त्रिमूर्ती चौक येथील कचर्‍याला लागलेल्या आगीच्या मुद्यावरून सोमवारी(ता.३) स्थायी समितीच्या बैठकीत महिला नगरसेवक चांगल्याच आक्रमक झाल्या. स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनीही प्रश्नाचा भडिमार केल्याने अधिकारी निरुत्तर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.प्राणी संग्रहालयच्या त्रुटी आणि दुरुस्तीसंबंधी वारंवार नोटिसा बजावून देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याने मराठवाड्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेले सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची मान्यता राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने रद्द केली होती.

 

यासंबधी नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर वसंत निकम याना वैद्य यांनी विचारले असता काम सुरू आहे. या बाबत अपील करणार आहोत असे म्हणताच परवानगी रद्द करून आठवडा उलटला आता काय मुहूर्त पाहता काय अपील करायला. यावर निकम निरुत्तर झाले. गेल्या बैठकीत मांडण्यात आलेला रिलायन्स मॉल त्रिमूर्ती चौक येथील साचलेला कचर्‍याला आग लागल्याच्या घटना नुकत्याच घडल्याने यावरून नगरसेविका जयश्री कुलकर्णी या आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. संबंधित अधिकार्‍यांना बोलताना कचरा प्रक्रिया मशीन बसवण्याचे वर्षानुवर्षापासून ऐकतोय पण रहिवाशी वस्तीत कचरा नको अशा सूचना वैद्य यांनी दिल्या.गणेश नगर,चिकलठाणा, . या व्यतिरिक्त सिद्धार्थ जलतरण तलाव नूतनीकरण संबधी टेंडर भाववाढ,विशेष भाववाढ,फरक,कपात,करारा संबंधी स्थायीची मान्यता घेणे, डिझेल खरेदी करिता वार्षिक करार,कैलास नगर स्मशानभूमी विकास कामा संबंधी मान्यता आदी विषय या बैठकीत मांडण्यात आली अनेक विषय उशिराने बैठकीत मान्यतेला का येतात असा सवालही वैद्य यांनी अधिकार्‍यांना विचारला.